लॉकडाउनने नुकसान, तरीही दीड हजार हेक्‍टरवर केळीची लागवड...कुठे वाचा

hingoli photo
hingoli photo

गिरगाव (जि.हिंगोली): वसमत तालुक्यातील गिरगावसह परिसरातील गावांत या वर्षी केळी लागवडीचे क्षेत्र वाढले असून जवळपास दीड हजार हेक्‍टरवर लागवड झाली आहे. या भागातून येलदरी व इसापूर धरणाच्या कालव्याला सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे शेतकऱ्यांनी लागवड वाढविल्याचे शेतकरी सांगत आहेत.

गिरगाव परिसरातून इसापूर व येलदरी धरणाचे दोन कालवे जातात. या कालव्यांना सोडलेल्या पाण्याचा परिसरातील शेतकऱ्यांना फायदा होतो. या वर्षी दोन्ही कालव्यांत पाणी सोडले आहे. त्‍यामुळे शेतकऱ्यांच्या विहिरी, बोअरवेलच्या पाणीपातळी वाढ झाली आहे.

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान

 त्‍याचा उपयोग शेतकरी सिंचनासाठी करीत आहेत. सिंचनासाठी पाणी उपलब्ध असल्याने गिरगावसह परजना, खाजमापूर वाडी, बोरगाव खुर्द, मुंरूबा, पार्डी बुदुक, डिग्रस खुर्द, सोमठाणा आदी गावांतील शेतकऱ्यांनी जवळपास दीड हजार हेक्टरवर केळीची लागवड केली आहे. मागच्या वर्षी एक हजार हेक्टरवर केळीची लागवड झाली होती. तसेच अवकाळी पावसामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते.

पाचशे ते सहाशे रुपये दर

 या वेळी मार्च व एप्रिल महिन्यात हळद, हरभरा, गहू या पिकांची काढणी झाल्यानंतर त्‍या जमिनीवर शेतकऱ्यांनी केळीची लागवड केली आहे. दरम्यान, लॉकडाउनमुळे केळी विक्रीला चांगलाचा फटका बसला असून दोन वर्षांपूर्वी सतराशे ते आठराशे रुपये क्‍विंटल विकली जाणारी केळी या वर्षी मात्र पाचशे ते सहाशे रुपये क्‍विंटलप्रमाणे विकावी लागली. तरीही केळीच्या उत्पादनावर शेतकऱ्यांनी विश्वास टाकला आहे.

दरवर्षी चांगला भाव मिळतो

या वर्षी केळीची जास्त क्षेत्रावर लागवड केली आहे. कोरोना संकटामुळे या वर्षी केळीला भाव मिळाला नाही. मात्र, दरवर्षी चांगला भाव मिळतो. पुढच्या वर्षी नक्‍कीच भावात वाढ होईल, अशी अपेक्षा ठेवून केळीची लागवड केली आहे.
-गजानन खारोडे (उत्‍पादक, मुरुंबा)


गिरगाव येथे हळदीचे भाव घसरले

बातमीदार : वसमत तालुक्यातील गिरगाव येथे मोठ्या प्रमाणावर हळद उत्‍पादक शेतकरी असून हळद उत्‍पादकांचे गटदेखील आहेत. सध्या हळद विक्रीची प्रक्रिया सुरू असून पाच हजार ते पाच हजार २०० रुपये क्‍विंटलप्रमाणे विक्री होत असल्याने त्‍याचा फटका उत्‍पादकांना बसला आहे.

नगदी पिके घेणाऱ्यांची संख्या अधिक

वसमत तालुक्‍यातील गिरगाव, परजना, खाजमापूर वाडी, मुंरुबा, बोरगाव खुर्द, सोमठाणा, पार्डी बुदुक, डिग्रस खुर्द या भागात हळदीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. अनेक शेतकऱ्यांचे गटदेखील आहेत. या गावात हळद, केळी, ऊस ही नगदी पिके घेणाऱ्यांची संख्या अधिक आहे. नऊ महिण्याचे हळदीचे पीक असून यासाठी खर्चदेखील तसाच होतो. 

क्‍विंटलला पाच हजार २०० रुपये भाव

मशागत, लागवड, खत, फवारणी, काढणी, शिजविणे, ढोल करणे त्‍यांनतर हळद तयार होते. सध्या ही प्रक्रिया पार पाडल्यानंतर हळद विक्रीसाठी कुरुंदा येथील उपबाजारपेठेत विक्रीसाठी नेली आहे. काही शेतकऱ्यांनी नांदेड व वसमत येथेदेखील हळद विक्रीसाठी नेलेली आहे. सध्या हळदीला पाच हजार ते पाच हजार २०० रुपये क्‍विंटलला भाव मिळत आहे. यामुळे उत्‍पादक मात्र अडचणीत आले आहेत. हळदीसाठी झालेला खर्चच अधिक असल्याचे सांगत आहेत.


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com