‘ही’ बँक करते शेतकऱ्यांना दिवसाला सात कोटींचे वाटप

‘ही’ बँक करते शेतकऱ्यांना दिवसाला सात कोटींचे वाटप

नादेड : सत्ता आणि सत्तेसाठी सुरु असलेल्या संघर्षात शेतकऱ्यांचा बळी जातो की काय असे वाटत असतानाच डिसेंबर महिण्यात अनेक नाट्यमय घडामोडी घडत होत्या. हे अख्या महाराष्ट्राने बघितले. मात्र या सत्ता संघर्षात रातोरात मंत्रीपदाची शपत घेतली गेली आणि त्यानंतर ‘टांगा पलटी घोडे फरार’ या म्हणीप्रमाणे विरोधकानी अंग काढुन घेतल्याने अवघ्या ४८ तासाच्या आता सरकार कोसळले. देशात राष्ट्रपती राजवट लागु झाली. राष्ट्रपतीच्या हातात कारभार जाताच राज्यपालांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी दिली होती. त्या कर्जमाफीचा आजही शेतकऱ्यांना लाभ मिळत आहे.

राज्यपालांनी दिलेल्या सरकट कर्जमाफीचा आकडा मोठा असल्याने नांदेड जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला आहे. यासाठी बागायतदार शेतकऱ्यांसाठी १६ तर कोरडवाहू शेतकऱ्यांना हेक्टरी आठ हजार रुपयापर्यंत कर्जमाफीचा लाभ दिला गेला. नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या खेताधारकांसाठी दोन टप्प्यात मिळुन ३६८ कोटी रुपये बँकेत जमा झाले आहेत. त्यामुळे बँक खातेदारास दिवसाला सात ते आठ कोटी रुपयाचे वाटप करत आहे.

हेही वाचा‘या’ कमानीवरील शब्दांची गळती
 
आत्तापर्यंत शंभर कोटी पर्यंतचे वाटप
राज्यपाल भगतसिंग कोसियारी यांनी राष्ट्रपती राजवट लागु असताना शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी दिली. मात्र अनेक शासकीय व खासगी बँकेत मनुष्यबळाची कमतरता आहे. त्यामुळे दिवसाला रक्कम वाटपासाठी कर्मचाऱ्यांची संख्या कमी पडत असल्याची बाबासमोर आली आहे. जिल्हा बँकेकडे साडेतीनशे कोटीपेक्षा अधिक रक्कम आली असली तरी, आत्तापर्यंत केवळ शंभर कोटी पर्यंतची रक्कमच वाटप झाली आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यालयातील अनेक कर्मचाऱ्यांना तात्पूर्त्या स्वरुपात ग्रामिण भागातील बँकेच्या शाखेत पाठविण्यात येत आहेत.

पहिल्या टप्यात इतकी रक्कम
जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे पहिल्या टप्यात ११८ कोटी रुपये इतकी रक्कम प्राप्त झाली होती. प्राप्त रकमेचे शेतकऱ्यांना वाटप सुरु असताना नाकी नऊ येत आहेत. यातच सरसकट कर्जमाफीचा २५० कोटी रुपयाचा दुसरा हप्ता बँकेत येऊन जमा झाला आहे. शिवाय महाविकास आघाडी सरकारच्या वतीने देखिल शेतकऱ्यांचे दोन लाखा पर्यंतच्या कर्ज माफीचा लाभ मिळणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना बँक खात्याशी आधार लिंक करावे लागणार आहे. त्यामुळे बँँकेत शेतकऱ्यांची मोठी गर्दी होत आहे.

बँक अधिकारी कर्मचारी तणावाखाली
राष्ट्रपती राजवटीत शेतकऱ्यांना तत्काळ सरसकट कर्जमाफी देण्यात आली. त्या पाठोपाठ स्थापन झालेल्या महाविकास आघाडीच्या सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीचा केलेला वादा पूर्ण करण्यासाठी दोन लाखापर्यंतचे कर्जमाफीची घोषणा केली. हे कर्ज बँक खात्याशी आधार लिंक शिवाय कुठल्याही अटी शर्थीविना कर्जमाफीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. त्यामुळे एकदम आलेल्या कामाच्या ताणामुळे बँक कर्मचारी व अधिकारी तणावाखाली आले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com