esakal | कनेरगावात बँक मित्राचे पावणे तीन लाख लंपास
sakal

बोलून बातमी शोधा

Crime

कनेरगावात बँक मित्राचे पावणे तीन लाख लंपास

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कनेरगाव नाका : हिंगोली तालुक्यातील कनेरगाव नाका येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या बँक मित्र (बी सी एजंट) यांची दोन लाख ८६ हजार रुपयांची बॅग चोरीला गेल्याची घटना सोमवारी घडली दरम्यान मंगळवारी ता. १४ घटनास्थळी गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उदय खंडेराय यांनी भेट देऊन सीसीटीव्हीचे फुटेज तपासले आहेत.

कनेरगाव नाका येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे बँक मित्र म्हणून सतीश गुंजकर व इतर दोघे मायक्रो एटीएमचे काम करतात. दोन दिवसांपासून बँकेला सुट्टी असल्याने बँक मित्रांकडे नेहमी पेक्षा जास्त गर्दी होती. नेहमीप्रमाणे श्री गुंजकर शाखेच्या बाजूला असलेल्या श्री. बागले यांच्या जागेमध्ये पैशाच्या देवाण-घेवाणचे मायक्रो एटीएम द्वारा काम करत होते. सोमवारी येथील आठवडी बाजार असल्याने यांच्याकडे पैशाचा भरणा करणाऱ्यांचे व पैसे काढणाऱ्यांची गर्दी होती. सायंकाळी चारच्या सुमारास सर्व व्यवहार झाल्यानंतर श्री गुंजकर यांनी आपल्या जवळची रोकड एक लाख ८६ हजार व बँकेमधून काढलेले एक लाख रुपये असे एकूण दोन लाख ८६ हजार रुपये ची रोकड बॅगेमध्ये ठेवली. ही बॅग ते बसलेल्या खुर्चीवरच पाठीमागे ठेवली नंतर समोर टेबलवर नोंदवहीत व्यवहार नोंद केला. व ही नोंद वही बॅगेमध्ये ठेवण्यासाठी मागे बघितले असता बॅग नसल्याचे आढळून आले.आजूबाजूला शोध केल्यावरही पैशाची बॅग आढळून न आल्याने एकच गोंधळ झाला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

loading image
go to top