
पंजाब नवघरे
वसमत : विदर्भातील एका तरुणीवर अत्याचार करून लग्न न करता खोट्या गुन्ह्यात अडकवून जिवाचे बरे वाईट करण्याची धमकी देणाऱ्या मराठवाड्यातील वसमत तालुक्यातील अकोली येथील एका तरुणाविरुद्ध वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात सोमवारी ता.७ गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी तातडीने तरुणाला चौकशीसाठी ताव्यात घेतले आहे.