abdul sattar and raosaheb danve
sakal
सिल्लोड - जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. बहुतांश गट आणि गणांमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना अशी थेट लढत होणार असल्याचे स्पष्ट होत असून, विधानसभेच्या निकालाचे पडसाद या निवडणुकीत उमटताना दिसत आहेत. एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या या तालुक्यात आता राजकीय सारीपाट पूर्णपणे बदलला आहे.