esakal | दारू पिण्यास विरोध केल्यावरुन शेतकऱ्यास मारहाण
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

वाघाळा (ता.पाथरी) गाव शिवारामध्ये असणाऱ्या पारधी शेतवस्तीवर शेतकरी तुकाराम धारोजी पवार (वय ६८) राहतात. शुक्रवारी सायंकाळी सात ते आठ वाजण्याच्या दरम्यान, जेवण केल्यानंतर ते नित्य नियमाप्रमाणे शेतामध्ये आले होते. या वेळी त्यांच्या शेतातील पाण्याच्या हौदाजवळ तिघेजण अवैधरित्या दारू पिताना दिसले. 

दारू पिण्यास विरोध केल्यावरुन शेतकऱ्यास मारहाण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पाथरी (जि.परभणी) ः शेतात सायंकाळच्या वेळी अवैधरित्या दारू पित बसलेल्या व्यक्तींना शेतकऱ्याने हटकले असता, त्यालाच बेदम मारहाण केली. यामध्ये मारहाण करून पळून जाणाऱ्या तिघांपैफी एकास गावकऱ्यांनी पकडून पोलिसांच्या हवाली केले. ही घटना शुक्रवारी (ता.१४) वाघाळा (ता.पाथरी) शिवारात घडली. दरम्यान, घटनेतील आरोपींवर पाथरी पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाघाळा (ता.पाथरी) गाव शिवारामध्ये असणाऱ्या पारधी शेतवस्तीवर शेतकरी तुकाराम धारोजी पवार (वय ६८) राहतात. शुक्रवारी सायंकाळी सात ते आठ वाजण्याच्या दरम्यान, जेवण केल्यानंतर ते नित्य नियमाप्रमाणे शेतामध्ये आले होते. या वेळी त्यांच्या शेतातील पाण्याच्या हौदाजवळ तिघेजण अवैधरित्या दारू पिताना दिसले. या वेळी या तिघांना त्यांनी येथे बसून दारू का पीत आहात?, असे विचारले असता चिडलेल्या तिघांनी मिळून तुकाराम पवार यांना बेदम मारहाण केली. या वेळी तुकाराम पवार यांच्या हातातील बॅटरी घेऊन त्यांच्या डोक्यात मारण्यात आल्याने त्यांनी आरडाओरड केली.

हेही वाचा - त्याने तिला टहाळ खायला बोलावले अन्...


आरडाओरड होताच ठोकला पळ
या वेळी वस्तीवर राहणारा त्यांचा मुलगा पंढरी पवार हा धावून आला. आरडाओरडा होत असल्याने तिघांनी मोटरसायकलवरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. या वेळी झालेल्या झटापटीत अंकुश वाघमारे यास पकडण्यात आले तर इतर दोघे पळून गेले. पकडण्यात आलेल्या अंकुश वाघमारे यास पाथरी पोलिस ठाण्यात आणले असता त्याने पळून गेलेल्यांची नावे सांगितली. या प्रकरणी अंकुश वाघमारे, केशव जावळे व कल्पेश गव्हाणे यांच्याविरुद्ध तुकाराम पवार यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा...

 परभणीतून युवती बेपत्ता


परभणी : एकोणीसवर्षीय युवती कॉलेजला जाते म्हणून घराबाहेर पडली. मात्र, परत घरी न आल्याने ती हरवल्याची तक्रार युवतीच्या भावाने कोतवाली पोलिस ठाण्यात दिली आहे. कृषीनगरातील एका व्यक्तीने कोतवाली पोलिस ठाण्यात रविवारी (ता.१६), आपली बहिण दहा फेब्रुवारीपासून हरवल्याचे म्हटले आहे. दहा फेब्रुवारी रोजी एका नर्सिंग कॉलेज येथून सकाळी नऊ-साडेनऊच्या सुमारास उड्डाणपुला जवळील एका कॉलेजमध्ये जाते म्हणून गेली. मात्र, अद्याप परत आली नसल्याचे म्हटले आहे. नातेवाईकांकडे शोध घेतला. मात्र, सापडली नसल्याने हरवल्याची तक्रार देत असल्याचे म्हटले. चेहरा गोल, रंग गोरा, उंची पाच फुट, अंगावर भगव्या रंगाचा टॉप, गुलाबी रंगाचे स्वेटर, फिकट काळ्या रंगाची जीन्स परीधान केलेली असल्याची माहिती पोलिस ठाण्यात दिली आहे. अशा वर्णनाची व्यक्ती कोणास आढळल्यास त्यांनी कोतवाली पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक पोलिस निरीक्षक व्ही. एस. अरसेवार यांनी केले आहे.
..... 

loading image