स्वस्त धान्य दुकानदारासह महिलांना मारहाण

प्रल्हाद कांबळे
शनिवार, 25 एप्रिल 2020

स्वस्त धान्य दुकानदारावर धान्य वाटप करत असताना गावातील काहींनी हल्ला करत E-POS मशीन फोडून धान्य फेकून दिले. एवढेच नाही तर जातीवाचक शिविगाळ करून मारहाण केली.

नांदेड : कारतळा (ता. कंधार) येथील शासकीय स्वस्त धान्य दुकानदारावर धान्य वाटप करत असताना गावातील काहींनी हल्ला करत E-POS मशीन फोडून धान्य फेकून दिले. एवढेच नाही तर जातीवाचक शिविगाळ करून मारहाण केली. या प्रकरणी कंधार पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कंधार तालुक्यातील कारतळा येथील दत्ता लक्ष्मन गायकवाड यांच्याकडे शासकीय स्वस्त धान्य दुकान आहे. ते त्यांच्या दुकानात ता. २० एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता स्वस्त धान्य वाटप करीत होते. यावेळी गावातीलच पंडित निवृत्ती कदम, अनिल विश्वाम्बर कदम, विश्वाम्बर मारोती कदम, नागेश पंडित कदम, तेजेराव विश्वांबर कदम, परमेश्वर मधुकर कदम, व्यंकटी धोंडिबा कदम, मधुकर लक्ष्मण कदम, नागेश अण्णाराव कदम, धनंजय निवृत्ती कदम, तुकाराम गोविंद कदम, अविनाश तुकाराम कदम, हणमंत कदम यांनी संगनमत करुन जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच लाथा बुक्यानी व काठ्यांनी मारहाण करत दुकानातील धान्य बाहेर फेकून दिले. यावेळी महिलांनाही मारहाण केली. 
 
कंधार पोलीस ठाण्यात वरील १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

दत्ता गायकवाड यांच्या फिर्यादीवरून कंधार पोलीस ठाण्यात वरील १२ जणांविरुद्ध अनुसुचित जाती जमाती अत्याचार कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. परंतु अद्यापपर्यंत आरोपींना अटक करण्यात आली नसल्याने संबंधित भयभीत कुटूंबावर दहशतीचे वातावरणात निर्माण झाले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी किशोर कांबळे हे करीत आहेत.

हेही वाचा -  ‘यांना’ राजकीय ‘द्वेषा’च्या संसर्ग झालाय....‘सिनेटायझरची’ गरज.....कोण म्हणाले ते वाचा

एनआरआय यात्री निवासमधील क्वारंटनाईन केंद्र हलवावे

नांदेड : सामाजीक आरोग्याचा धोका टाळण्यासाठी भर वस्तीत असलेल्या एनआरआय यात्री निवास येथील कोरोना क्वारंटाईन केंद्र इतत्र हलवावे अशी मागणी स्थानिक शिख समाजाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. 

यात्री निवास, वाचनालय, शाळा, सत्संग भवन, म्युझीअम, तहसील कार्यालयासह आदी कार्यालये आहेत. या भागात दाट लोकवस्तीसुद्धा आहे. विशेष म्हणजे याच परिसरात पंजप्यारे साहिबान यांचे निवासस्थान आहे. यासोबतच गुरूद्वारातील किर्तनकार यांचेही निवासस्थान आहे. 
या परिसराला लागूनच चिखलवाडी, भोईगल्ली, वृद्धाश्रम हा सर्व भाग संक्रमीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रत्यक्षात क्वारंटाईन केंद्र हे यात्री निवासातून शहराबाहेर सुरक्षीतस्थळी हलवावे अशी मागणी करण्यात आली आहे. 

निवेदनावर यांच्या आहेत स्वाक्षऱ्या 

दिलेल्या निवेदनावर स. अमरजीतसिंग महाजन, मनबिरसिंग ग्रंथी, योगासिंग महाजन, मंजीतसिंग चव्हाण, जोगिंदरसिंग खालसा, जगदीपसिंग नंबरदार, अमरजीतसिंग हंडी बलबिरसिंग लांगरी यांच्यासह शिख समाजातील अनेकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Beating women with cheap grain shopkeepers nanded news