
बीड : गृहरक्षक दलातील (होमगार्ड) तरुणीचा तिच्याच मैत्रिणीने खून केल्याचे तपासात उघड झाले. पोलिसांनी संशयित वृंदावणी सतीश फरतारे (वय ३०) हिला अटक केली आहे. दरम्यान, या कृत्यात तिने आपल्या चौदा वर्षीय मुलाची मदत घेतली होती. त्यामुळे त्याच्याविरुद्धही गुन्हा दाखल झाला आहे.