Beed Crime : पाटोदा तालुक्यातील डोंगरकिन्ही येथे शेतकऱ्याने संपवले जीवन
Crime News : बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात डोंगरकिन्ही येथे संभाजी येवले या ४४ वर्षीय शेतकऱ्याने नैराश्यातून शेतात गळफास घेऊन जीवन संपवले. नोकरी नाही, मुलांना आरक्षण नाही आणि शेतमालाला भाव नाही, या तिहेरी संकटामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले.
अंमळनेर, (जि. बीड) : पाटोदा तालुक्यातील डोंगरकिन्ही येथील शेतकऱ्याने शुक्रवारी (ता. २३) गळफास घेत आत्महत्या केली. संभाजी रघुनाथ येवले (वय ४४) असे त्यांचे नाव आहे.