
Latest Marathwada News: एका ऊसाच्या शेतात कापडात लपेटून ठेवलेले तीन महिन्यांचे पुरूष जातीचे बाळ होळ-आडस रस्त्याच्या कडेला सोमवारी (ता.२३) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास आढळून आले आहे. त्या बाळाला पोलीसांनी उपचारासाठी अंबाजोगाई येथील शासकीय रूग्णालयात दाखल केले आहे. नेमकं या बाळाची आई त्याला असे टाकून का गेली असेल? अशी चर्चा या भागात आहे.