
गेवराई : बीड जिल्ह्यातील वाढती गून्हेगारी लक्षात घेता तसेच भविष्यात कायदा व सुव्यवस्था आबधीत रहावी,या दृष्टिकोनातून बीड जिल्हा महसूल प्रशासनाने देखील कार्यवाईचा फास आवळला असून, गेवराईतील अधीकृत आठ शस्त्र परवाने धारक यांना पोलिस प्रशासन यांच्या वतीने नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. नोटीस मिळाल्यानंतर ४८ तासांत लेखी खूलासा सादर केला नाही तर शस्त्र परवाना रद्द करण्यात येईल असे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.