Beed : स्वतःच्या अश्रूंना बांध; दुसऱ्यांच्या दु:खावर फुंकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Beed : स्वतःच्या अश्रूंना बांध; दुसऱ्यांच्या दु:खावर फुंकर

Beed : स्वतःच्या अश्रूंना बांध; दुसऱ्यांच्या दु:खावर फुंकर

बीड : डॉ. ज्योती विनायकराव मेटे यांच्याकडून मागच्या तीन दिवसांपासून शहरालगतच्या वस्त्या, वृद्धाश्रम, निराधारांना दिवाळी फराळ वाटप सुरु आहे. दिवाळी फराळ किंवा वंचित उपेक्षितांना मदत ही फार वेगळी बाब नाही. मात्र, मागच्या दोन महिन्यांचा विचार केला तर यातून डॉ. ज्योती मेटे यांचा संवेदनशीलपणा व धीरोदात्तपणाचा प्रत्यय येतो.

हेही वाचा: Beed : शासनाचा शिधा पदरात कधी?

त्यांची भेटवजा मदत ही त्यांच्या वेतनाच्या रकमेतून आहे आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे त्यांच्यावर आभाळ फाटून उणे-पुरे दोन महिन्यांचा काळच लोटला आहे. ४० वर्षे सामाजिक, राजकीय चळवळीत घालविणारे विनायकराव मेटे सव्वादोन महिन्यांपूर्वी (ता. १४ ऑगस्ट) मराठा आरक्षणाच्या बैठकीला जाताना त्यांच्या वाहनाचा अपघात होऊन मृत पावले. राज्यभरातील त्यांचे चाहते पोरके झाले. पण, मेटे कुटुंबीयांसाठी तर आभाळच फाटले.

हेही वाचा: Beed : संकटातील शेतकऱ्यांना सावरण्यासाठी सरकारने मदत द्यावी; पंकजा मुंडे

त्यात पती निधनामुळे डॉ. ज्योती मेटे यांच्या दु:खाबाबत कल्पना न केलेली बरी. मात्र, आपल्यावर आकांक्षा व आशुतोष या दोन मुलांसह मेटे कुटुंबीय राज्यातील पोरक्या झालेल्या शिवसंग्राम परिवाराची आणि पतीने उभारलेली सामाजिक चळवळ पुढे न्यायची जबाबदारी खांद्यावर असल्याची जाण डॉ. ज्योती मेटे यांना असल्याचे त्यांच्या या सव्वा दोन महिन्यांतील वाटचालीवरून दिसते.

हेही वाचा: Beed : नुकसानीचा अहवाल शासनाला पाठवणार

तसे, सधन व शिक्षित कुटुंबातील डॉ. ज्योती मेटे देखील उच्चशिक्षित (एमबीबीएस) असून भाऊ भारतीय पोलिस सेवेतील वरिष्ठ अधिकारी आहेत. त्या स्वत: देखील सहकार खात्यात विभागीय सहनिबंधक म्हणून लातूरला कार्यरत आहेत. दिवंगत विनायकराव मेटे मागील २७ वर्षे सतत सत्तेच्या परिघात असले तरी डॉ. मेटे या परिघापासून कायम दूरचं असत.

हेही वाचा: Beed : बळिराजाची व्यथा पंकजा मुंडेंनी मांडावी शासनाकडे ; शेतकऱ्यांची मागणी

कधीही त्यांनी स्वत:ची पोस्टींग, बदली व बढतीसाठी याचा वापर केला नाही. प्रामाणिक अधिकारी अशीच त्यांची सहकार खात्यात ओळख आहे. विशेष म्हणजे त्यांनी आपले प्रशासकीय काम देखील कधी विनायकराव मेटेंना सांगितले नाही. अथवा त्यांना आतापर्यंत सेवाज्येष्ठता, त्यांनी केलेल्या विशेष कामामुळे भारतीय प्रशासन सेवा (आएएस) नामांकन मिळायला हवे होते.

हेही वाचा: Beed : आई-वडिलांप्रमाणे आम्ही ऊस तोडावा का?

मात्र, त्यांनी नोकरीतही कायम तत्त्व जपल्याचे त्यांचेच कलीग (सहकारी) सांगतात. फार तर शिवसंग्रामच्या महिलांसाठीच्या सामाजिक उपक्रमांत दिसत. आता मात्र आपले दु:ख बाजूला ठेवत डॉ. ज्योती मेटे पुढे आल्याचे दिसते.

हेही वाचा: Beed : पालकमंत्र्यांकडून नुकसानीची सर्वंकष पाहणी गरजेची

दिवाळी फराळाचे वाटप

विनायकराव मेटेंच्या निधनानंतर महिनाभरानेच त्यांनी शिवसंग्राम परिवारातील लोकांच्या दु:खद प्रसंगात सहभाग घेतला. समोरच्याचे दु:ख ऐकताना स्वत:चे दु:खाला आणि अश्रूलाही त्या आवर घालतात. आपली नोकरी सांभाळून त्या घर आणि शिवसंग्राम अशी तिहेरी जबाबदारी त्या पेलत आहेत.

हेही वाचा: Beed : बीडमध्ये प्रथमच राज्यस्तरीय बालाघाट हिल हाफ मॅरेथॉन

जिल्ह्यातील शिवसंग्राम परिसरातील कार्यकर्त्यांच्या दु:खद प्रसंगात जायचे चुकणार नाही याची त्यांनी आतापर्यंत काळजी घेतली आहे. आताही सर्वत्र दिवाळी साजरी होत असताना उपेक्षित, कष्टकरी, कामगार गरिबांच्या दिवाळीची चिंता डॉ. ज्योती मेटे यांनी केली आणि हजारांहून अधिक वंचितांना त्यांनी वेतनाच्या रकमेतून दिवाळी फराळ वाटप केला.