धक्कादायक! परळीत दिव्यांग तरुणीवर चुलत भावाने केला बलात्कार

प्रवीण फुटके
Thursday, 11 February 2021

येथील ग्रामीण पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील एका गावात तीस वर्षीय दिव्यांग तरुणी राहत होती.

परळी (बीड): तालुक्यात नात्याला काळीमा फासणारी घटना घडली असून दिव्यांग बहिणीवर चुलत भावाने अत्याचार केला आहे. याप्रकरणी येथील ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

येथील ग्रामीण पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील एका गावात तीस वर्षीय दिव्यांग तरुणी राहत होती. ५ फेब्रुवारी ला दुपारी दोन वाजता ती आपल्या घरी एकटी असल्याचे पाहून तीचा चुलत भाऊ घरात घुसला. सुरुवातीला त्या भावाने तिची छेड काढली नंतर बळजबरीने तिच्यावर अत्याचार केला.

कर्नाटकातील तरुणाच्या गुढमय मृत्यूप्रकरणी दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल

त्यानंतर तो तिथून पसार झाला. पिडीतीने घडलेला सर्व प्रकार कुटुंबातील सदस्यांना सांगितला. कुटुंबातील सदस्यांनी येथील ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. ग्रामीण पोलिसांनी तक्रारीवरून विनयभंग, बलात्कार प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक निरीक्षक प्रताप नवघरे करत आहेत.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Beed breaking news Divyang girl was molested by her cousin in Parli