
मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत हे ठिय्या आंदोलन चालूच राहणार असल्याचे येथील मराठा बांधवांनी सांगितलं आहे
गेवराई (बीड): जालना जिल्ह्यातील साष्टपिंपळगाव येथे (ता.20) जानेवारी रोजी सुरू झालेल्या राज्यव्यापी ठिय्या आंदोलन सुरु झाले होते. आता त्याचे लोण गेवराई तालुक्यात पोहचले असून तालुक्यातील मालेगाव खुर्द येथे सोमवार (ता.एक) फेब्रुवारीपासून ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली आहे. या आंदोलनाला पाच दिवस उलटून गेले आहेत. या आंदोलनास मराठा समाज बांधवांसह इतर समाजाचाही भरभरून प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.
आता तालुक्यातील ग्रामीण भागात देखील बाजारपेठ बंद ठेवून आंदोलनाला प्रतिसाद मिळत आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाप्रश्नी तालुक्यातील मालेगाव खुर्द येथे चालू असलेल्या ठिय्या अदोलनाला पाच दिवसं झाले आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत हे ठिय्या आंदोलन चालूच राहणार असल्याचे येथील मराठा बांधवांनी सांगितले आहे.
पंकजांच्या धनंजय मुंडेंना शुभेच्छा, 'चांगला विकास करा', धनंजय...
या ठिय्या आंदोलनात आता ग्रामीण भागातील मराठा बांधव देखील उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत. शुक्रवार(ता.पाच) रोजी तालुक्यातील उमापूर, राक्षसभुवन, सुरळेगाव, मालेगाव बु,गुळज गाव बंद ठेवून मराठा बांधवांनी मालेगाव येथे जाऊन या आंदोलनात सहभाग नोंदवला. दरम्यान शुक्रवार(ता.पाच)रोजी सकल मराठा समाज बांधव पुणे येथून चारचाकी पन्नास वाहनाची रॅली काढून मालेगाव खुर्द व जालना जिल्ह्यातील साष्टपिंपळगाव येथील आंदोलनात सहभागी झाले.
(edited by- pramod sarawale)