बीड : महामार्गावरील सिमेंट थर उखडू लागला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Beed cement layer damage on Nagar Ahmedpur road

बीड : महामार्गावरील सिमेंट थर उखडू लागला

बीड : जिल्ह्यातून जाणाऱ्या नगर - अहमदपूर या ५४८ क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गाचे काम निकृष्ट झाले आहे. अद्याप टोलवसुलीही सुरु झालेली नसताना रस्त्याला तडे आणि सिमेंटचा थर निघत असल्याचे समोर आले आहे. सुरुवातीपासून या रस्त्याचे काम निकृष्ट, कामात दिरंगाई असे प्रकार सुरु आहेत. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली आहे.

चुंबळी ते अहमदपूर या १७० किलोमीटरचे रस्ताकाम साधारण ८७९ कोटी रुपयांचे असून चार वर्षांपूर्वी हाती घेतलेले हे काम अद्यापही पूर्णत्वास गेले नाही. संबंधित काम करणाऱ्या यंत्रणेची मनमानी आणि अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे या कामाबाबत कायम तक्रारी करुनही दुर्लक्ष होत आहे. संथगतीने काम, अपूर्ण कामामुळे अपघातांचे प्रकारही सर्रास सुरु आहेत.

त्यात आता झालेल्या सिमेंट रस्त्याचा थर निघायला सुरुवात झाली आहे. तसेच, अनेक ठिकाणी रस्त्याला तडेही गेले आहेत. याबाबत डॉ. गणेश ढवळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत औरंगाबाद येथील मुख्य अभियंत्यांना निवेदन दिले आहे. कामाची गुणनियंत्रकामार्फत चौकशी करावी आणि कारवाई करावी, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.

आता ठिगळं लावायला सुरुवात

अगोदर निकृष्ट कामामुळे सिमेंट रस्त्याला जागोजागी तडे गेले आहेत. अनेक ठिकाणी रस्ता उखडला आहे. आता या रस्त्याला दुरुस्तीचे ठिगळं लावायला सुरुवात झाली आहे. कामाचा वेगही मंद असल्याने अपघातांचे प्रकार घडत असल्याचे डॉ. गणेश ढवळे म्हणाले.

Web Title: Beed Cement Layer Damage On Nagar Ahmedpur Road Complaint To District Collector

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..