esakal | कोरोनाचे ४८ रुग्ण, तीन मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

BEED

Beed : कोरोनाचे ४८ रुग्ण, तीन मृत्यू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बीड : कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेच्या कहरानंतर तीन महिन्यांनी रुग्णसंख्या आटोक्यात आल्यानंतरही कोरोनाबळीचे सत्र सुरुच आहे. शुक्रवारी (त. एक) नवीन दोन व जुना एक असे तीन कोरोनाबळींची नोंद झाली. शुक्रवारी रुग्णसंख्या व पॉझिटिव्हिटी रेटमध्येही काहीशी वाढ झाली.

कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा भयंकर कहर जिल्ह्याने सहन केला. सर्वत्र लाट ओसल्यानंतरही जून ते सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपर्यंत जिल्ह्यात तीन अंकी रुग्णसंख्या होती. मात्र, मागच्या काही दिवसांत रुग्णसंख्या दोन अंकी होऊन आता ५० च्या खालीही आली आहे. दरम्यान, गुरुवारी (ता. ३०) २३५३ स्वॅब नमुन्यांच्या तपासणीत ४८ रुग्ण आढळून आले. तपासणींच्या तुलनेत पॉझिटिव्हिटी रेट दोन टक्क्यांहून अधिक होता. तर, २३०५ स्वॅब नमुने निगेटिव्ह आले.

सर्वाधिक रुग्ण बीड व पाटोदा तालुक्यात आढळले. दोन्ही तालुक्यांत प्रत्येकी १२ रुग्ण आढळले. पाटोद्याच्या घटलेल्या संख्येत काहीशी वाढ झाली. तर, अंबाजोगाई व आष्टीत प्रत्येकी सहा, गेवराई दोन, केज एक, माजलगाव तीन, परळी चार व शिरूर कासारमध्ये दोन रुग्ण आढळले. जिल्ह्याची रुग्णसंख्या आता एक लाख २७७२ झाली असून आतापर्यंत ९९ हजार ६९१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर, सध्या ३१० रुग्ण जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेर उपचार घेत आहेत.दरम्यान, मृत्युसत्र कायम असून शुक्रवारी नवीन दोन व जुना एक असे तीन कोरोनाबळी गेले. आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनाबळींची संख्या २७७१ झाली आहे. मृत्यूदर २.६९ टक्के आहे. राज्याच्या सरासरी कोरोना मृत्यू दरापेक्षा जिल्ह्यात हा दर काहीसा अधिक आहे.

loading image
go to top