बीडला पुन्हा धक्का; आठ नवे कोरोना रुग्ण सापडले : रुग्णसंख्या 19 वर

दत्ता देशमुख
Wednesday, 20 May 2020

मंगळवारी 66 जणांचे लाळेचे नमुने तपासणीला पाठविले. यातील आठ जणांना कोरोना असल्याचे निष्पन्न झाले. यात केज तालुक्यातील दोन, इटकूर (ता. गेवराई) येथील एक व बीड शहरातील एकाचा समावेश आहे. दरम्यान, तीन नमुन्यांचे निष्कर्ष आले नाहीत. केज तालुक्यातील काळेगाव, चंदनसावरगाव, गेवराई तालुक्यातील इटकूर व बीड शहरातील रुग्णांचा समावेश आहे.

बीड : जिल्ह्यात मंगळवारी (ता. 19) पुन्हा आठ नवीन कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले. आता रुग्णसंख्या 19 वर गेली आहे.

जिल्ह्यात सुरुवातीला मुंबईहून विनापरवाना आलेल्या दोघांना कोरोनाची बाधा झाल्याचे आढळले होते. त्यानंतर रविवारी नगर जिल्ह्यातील एक कुटुंब मुंबईहून सांगवी पाटण येथे आले होते. या कुटुंबातील सात जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. यातील 65 वर्षीय वृद्धेचा सोमवारी पहाटे मृत्यू झाला. त्यानंतर उर्वरित सहा जण पुढील उपचारासाठी पुण्याला गेले. 

 हेही वाचा - औरंगाबादेत१८ महिण्यांच्या बाळाला कोरोना  

दरम्यान, मंगळवारी 66 जणांचे लाळेचे नमुने तपासणीला पाठविले. यातील आठ जणांना कोरोना असल्याचे निष्पन्न झाले. यात केज तालुक्यातील दोन, इटकूर (ता. गेवराई) येथील एक व बीड शहरातील एकाचा समावेश आहे.

दरम्यान, तीन नमुन्यांचे निष्कर्ष आले नाहीत. केज तालुक्यातील काळेगाव, चंदनसावरगाव, गेवराई तालुक्यातील इटकूर व बीड शहरातील रुग्णांचा समावेश आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Beed Corona Updates 8 Found Positive Now 19 Patients In Total