esakal | बीडमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा वेग वाढवतोय चिंता!
sakal

बोलून बातमी शोधा

corona update

बीडमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा वेग वाढवतोय चिंता!

sakal_logo
By
दत्ता देशमुख

बीड: कोरोना विषाणू संसर्गाची (covid 19 infection) दुसऱ्या लाटेत आढळणारे रुग्ण आणि रोजचे मृत्यूचे आकडे सर्वांचीच भीती वाढवत आहेत. पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेतील (second wave of corona) दिवसांची संख्या, रुग्णसंख्या, मृत्यूंची संख्या यात प्रचंड वेग आहे. मात्र, सध्या दिलासादायक बाब म्हणजे शेकडा मृत्यूदरात (death rate) झालेल्या घसरणीचा आहे.

पहिल्या लाटेत ११ महिन्यांतील ३३६ दिवसांत १९ हजार रुग्ण आणि ५८३ मृत्यूंची नोंद होती. दुसऱ्या लाटेत केवळ ७३ दिवसांमध्ये तब्बल ५७ हजार ७२६ नवे रुग्ण आढळले असून दुसऱ्या लाटेत या कालावधीत तब्बल ९४८ मृत्यूंची नोंद आहे. फरक येवढाच की पहिल्या लाटेत कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचा शेकडादर ३.०६ टक्के होता. तर, दुसऱ्या लाटेतील हा शेकडा मृत्यूदर १.०६ टक्के आहे.

हेही वाचा: आजीचं अख्खं कुटुंब कोरोनाबाधित; मदतीला धावला 'देवदूत'

दरम्यान, पहिल्या व दुसऱ्या लाटेतील कोरोनाग्रस्त रुग्ण, एकूण दिवस व एकूण मृत्यूंच्या आकड्यांवर नजर मारल्यानंतर दुसऱ्या लाटेचा वेग भयावह असल्याचे दिसते. मागच्या वर्षी २०२० मध्ये मार्च महिन्याच्या शेवटी कोरोना विषाणू संसर्गाची लागण सुरु झाली. जिल्ह्यात सात एप्रिलला पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर चार मार्च २०२१ पर्यंत कोरोना विषाणू संसर्गाची पहिल्या लाटेचा प्रादुर्भाव होता. या ११ महिन्यांतील ३३६ दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यात १९ हजार रुग्ण आढळले. तर, जिल्ह्यातील ५८३ कोरेानाग्रस्तांच्या मृत्यूंची नोंद झाली. या कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचे शेकडा प्रमाण ३.०६ टक्के होते.

पाच मार्च पासून कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव जिल्ह्यात आढळला. रुग्णांची नियमित संख्येने दिड हजारांचाही पल्ला पार केला. आता ही संख्या १२००च्या घरात आली आहे. दुसऱ्या लाटेतील ७३ दिवसांत तब्बल ५७ हजार ७२६ रुग्ण आढळले आहेत. तर, या कालावधीत तब्बल ९४८ मृत्यू झाले आहेत. या आकड्यांवरुनच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या वेगाची भयावहता सहज लक्षात येईल. मात्र, मृत्यूचा शेकडा दर मात्र पुर्वीच्या तुलनेने कमी झाला आहे. दुसऱ्या लाटेतील कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचे शेकडा प्रमाण १.०६ टक्के आहे. आता मंगळवार (ता. १८) पर्यंत जिल्ह्याची रुग्णसंख्या ७६ हजार ७२६ झाली असून आतापर्यंत १५३१ मृत्यूंची नोंद आहे.

हेही वाचा: 'शेतकऱ्यांना जुन्या खतांची विक्री जुन्या दरानेच करा'

पहिली लाट-

पहिला रुग्ण : सात एप्रिल २०२०

पर्यंत : ४ मार्च २०२१ पर्यंत

एकूण दिवस : ३३६

एकूण रुग्ण : १९ हजार.

एकूण मृत्यू : ५८३

मृत्यूचे शेकडा प्रमाण : ३.०६ टक्के

दुसरी लाट

पाच मार्च २०२१ पासून

एकूण दिवस : ७३

एकूण रुग्ण : ५७ हजार ७२६

एकूण मृत्यू : ९४८

मृत्यूचे शेकडा प्रमाण : १.०६ टक्के.