Beed Crime: वडिलांसोबत जाणाऱ्या तरुणीला अडवत मागितला नंबर, तरुणावर गुन्हा दाखल
Latest Marathwada News: वडिलांसोबत जाणाऱ्या तरुणीला अडवत मोबाइल नंबर मागण्यात आला. तर, फेसबुकवर अश्लील पोस्ट टाकत महिलेची बदनामी करण्यात आली. हे प्रकार उत्तरानगरी आणि बीड बायपास भागात घडले. याप्रकरणी आरोपींविरुद्ध सिडको एमआयडीसी पोलिस ठाणे आणि सातारा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
पहिल्या घटनेत : पीडित तरुणी शनिवारी (ता.२४) दुपारी वडिलांसोबत घरी जात होती. यावेळी संशयित आरोपी दीपक कदम (रा. चौधरी इस्टेट) याने गाडी अडवत मोबाइल नंबर मागितला. आरोपी व त्याचे मित्र तरुणीला नेहमीच मोबाइल नंबर मागतात, अशी तक्रारीत नमूद आहे. याप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून एपीआय शैलेश देशमुख तपास करीत आहेत.
दुसऱ्या घटनेत : फेसबुकवर महिलेचा फोटो वापरत बदनामी करण्यात आल्याची घटना २१ ऑगस्टला घडली. महिला उत्तरानगरी भागातील आहे. अज्ञात आरोपीने दुसऱ्या महिलेच्या अकाउंटवर पीडितेचा फोटो आणि अश्लील पोस्ट टाकत बदनामी केली. महिलेच्या तक्रारीवरून सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस निरीक्षक गौतम पातारे तपास करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

