
Beed OBC Leader: ओबीसी आरक्षण बचाव यात्रेच्या निमित्ताने लक्ष्मण हाकेंनी बीडमध्ये अनेक सभा घेतल्या. मराठावाड्यातल्या इतरही काही जिल्ह्यांमध्ये हाकेंनी सभा घेतल्या. त्यावेळी त्यांच्यासोबत सावलीसारखा राहणारा त्यांचा साथीदार पवन कारवर यांच्यावर हल्ला झाला आहे. या हल्ल्यामध्ये ते गंभीर जखमी झाले आहेत.
लक्ष्मण हाके यांच्या ताफ्यावर गेवराईमध्ये हल्ला झाला होता, तेव्हा पवन हे त्यांच्या गाडीवर चढून समोरच्या गर्दीला आव्हान देत होते. त्यांच्या हातामध्ये एक काठीदेखील होती. त्यानंतर त्यांचे व्हिडीओ व्हायरल झाले. लोकांनी त्यांना सोशल मीडियात ट्रोल केलं.