Ganja Seizure : पोलीस अधीक्षकांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून बीड स्थानिक गुन्हे शाखा आणि अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी घाटनांदूर येथील निहाल रामभाऊ गंगणे याच्या घरावर छापा टाकून दोन लाख त्रेचाळीस हजार रुपये किंमतीचा १२ किलो गांजा जप्त केला असून एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घाटनांदूर : येथील अण्णाभाऊ साठे चौका जवळील एका घरावर (ता.७) मंगळवारी रात्री छापा मारून बारा किलो गांजासह एकास ताब्यात घेण्यात आले असून (ता.८) पहाटे एक वाजता अंबाजोगाई ग्रामीण पोलिस ठाण्यात पुन्हा नोंदविण्यात आला आहे.