esakal | सख्ख्या भावाने काढला सख्ख्या भावाचा काटा, तीक्ष्ण हत्याराने केला खून
sakal

बोलून बातमी शोधा

Majalgaon Crime News

या जागेवरून शेख अर्षद व शेख इर्शाद या दोन भावांमध्ये मागील अनेक दिवसांपासुन कुरबुर होती.

सख्ख्या भावाने काढला सख्ख्या भावाचा काटा, तीक्ष्ण हत्याराने केला खून

sakal_logo
By
कमलेश जाब्रस

माजलगाव (जि.बीड) : तालुक्यातील पात्रुड येथे मुख्य रस्त्यावर असलेल्या प्लाॅटचा दोन सख्ख्या भावात वाद होता. या वादातून लहान भावाने मोठ्या भावाचा तीक्ष्ण हत्याराने जखमी करून खुन केल्याची घटना तालुक्यातील पात्रुड येथे सोमवारी (ता.आठ) सायंकाळी आठ वाजता घडली असून आरोपी शेख अर्षदला पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत माहिती अशी की, तालुक्यातील पात्रुड येथे मुख्य रस्त्यावर शेख शकील यांची जागा आहे.

पुण्याहून गावाकडे आईला भेटायला चाललेल्या मुलाचा भीषण अपघातात मृत्यू

या जागेवरून शेख अर्षद व शेख इर्शाद या दोन भावांमध्ये मागील अनेक दिवसांपासुन कुरबुर होती. या वादाचे रूपांतर आज भांडणात होऊन लहान भाऊ अर्षद याने त्याचा मोठा भाऊ इर्षाद याला तीक्ष्ण हत्याराने जखमी करून खुन केल्याची घटना घडली आहे. जखमी अवस्थेत माजलगाव रूग्णालयात दाखल केले असता पोटांमध्ये गंभीर घाव झाल्याने शेख इर्शादचा जागीच मृत्यु झाला आहे. आरोपी अर्षदला पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल झाला नव्हता.

संपादन - गणेश पिेटेकर

loading image
go to top