esakal | कोरोना नियम मोडल्याने वधूवरासह ३०० जणांवर कारवाई, थाटात लग्न करणे पडले महागात
sakal

बोलून बातमी शोधा

Beed Crime News

धारूर आणि पैठण येथील कुटुंबीयांनी विवाहासाठी निवडलेले मांजरसुंबा हे ठिकाण अडचणीचे ठरले.

कोरोना नियम मोडल्याने वधूवरासह ३०० जणांवर कारवाई, थाटात लग्न करणे पडले महागात

sakal_logo
By
सुरेश रोकडे

नेकनूर (जि.बीड) : धारूर आणि पैठण येथील कुटुंबीयांनी विवाहासाठी निवडलेले मांजरसुंबा हे ठिकाण अडचणीचे ठरले. बुधवारी (ता.सात) बोहल्यावर चढलेल्या नवरा-नवरीसह विवाहास उपस्थित  असणाऱ्या ३०० उपस्थितांना नेकनूर पोलिसांनी सायंकाळी सव्वासात वाजता कारवाईचा दणका दिला. मांजरसुंबा येथील बीड रस्त्यावर असणाऱ्या कन्हैय्या लॉन्स या ठिकाणी  मोठ्या प्रमाणात प्रमाणात गर्दी झाल्याचे नेकनूर पोलिसांना कळल्यानंतर त्यांनी तिकडे धाव  घेतली. या ठिकाणी धारूर येथील अमित अर्जुन गायकवाड आणि पैठण (जि. औरंगाबाद) येथील ऋतुजा दीपकराव चव्हाण या दोघांचा विवाह सोहळा होत असल्याने गर्दी दिसून  आली.

धक्कादायक! कोरोनाबाधित विद्यार्थी परीक्षा देत असल्याचे कळताच उडाला एकच गोंधळ, अनेकांनी काढला पळ  

यामुळे साथरोग, आपत्ती व्यवस्थापन आधी कलमाचे उल्लंघन झाल्याने ग्रामसेवक  जगदीश कडू फिर्यादीवरून नवरा, नवरी त्यांचे आई-वडील  मामा, लग्न लावणारे ब्राह्मण,  मॅनेजर यांच्यासह इतर तीनशे लोकांवर साथरोग आपत्ती व्यवस्थापन या कलमाखाली नेकनूर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाईत सहायक पोलिस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे, फौजदार विलास जाधव यांच्यासह कर्मचाऱ्यांनी केली.

संपादन - गणेश पिटेकर