Aurangabad : औरंगाबादेत भीषण अपघात, ट्रकने चिरडल्याने तरुणाचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Accident
Aurangabad : औरंगाबादेत भीषण अपघात, ट्रकने चिरडल्याने तरुणाचा मृत्यू

Aurangabad : औरंगाबादेत भीषण अपघात, ट्रकने चिरडल्याने तरुणाचा मृत्यू

औरंगाबाद : औरंगाबाद शहरात दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढत चालले आहे. अपघाताचे प्रमाण कमी व्हावे यासाठी प्रयत्न होताना दिसत नाहीत. सिडको चौकात झालेल्या भीषण अपघातात तरुण ठार झाला आहे. ही घटना आज गुरुवारी (ता.१६) दुपारी घडली. रोहित दिनकर नरवडे (वय २१) असे मृत तरुणाचे नाव आहे. मृत तरुण रमानगर येथील रहिवासी असल्याचे सांगितले जात (Aurangabad Accident) आहे. सिडको चौकातून मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाकडे (Aurangabad Bench) दुचाकीवरुन जात होता. जवळून गॅस सिलिंडर घेऊन जाणारा ट्रक जात होता. अचानक दुचाकी घसरल्याने रोहित नरवडे खाली पडला. ट्रकच्या चाकाखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटना घडल्यानंतर संबंधित ट्रक चालक पसार झाला आहे. (Aurangabad Accident Update Youth Died In Accident In Cidco Chowk)

हेही वाचा: कोरोना लसीकरणावरुन सुनील केंद्रेकर भडकले, बैठकीतून COला काढले बाहेर

बेशिस्त वाहतूक

शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्याची गरज आहे. रोज अपघाताच्या घटना घडत आहेत. त्यासाठी नियोजन करण्याची गरज आहे. औरंगाबादेत उड्डाणपूल विकास दिसत आहे. म्हणजे गर्दी वाढली बांधा उड्डाणपूल. पण पुढे काय? शहरवासीयांना वाहतूक नियोजनात सहभागी करुन घेऊन उपाय-योजना करण्याची आवश्यकता आहे.