Beed Dams: बीडमध्ये दिलासा; १४५ प्रकल्प काठोकाठ भरले, पाण्याची चिंता संपली!
Beed Rainfall: बीड जिल्ह्यातील १६७ पैकी १४५ प्रकल्प पाण्याने काठोकाठ भरले असून उपयुक्त पाणीसाठा ९७.५ टक्के आहे. जोरदार पावसामुळे पिकांचे नुकसान झाले असले तरी आगामी काळातील पिण्याच्या पाण्याची चिंता दूर झाली आहे.
बीड : मागील महिन्यात आणि या आठवड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून पिकांचे नुकसान झाले असले तरी यामुळे आगामी काळातील पिण्याच्या पाण्याची चिंता संपुष्टात आली आहे.