Accident News: ऊसतोडीसाठी स्थलांतरित झालेल्या देवदहिफळ येथील महादेव बडे यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कर्नाटकातील कोल्हारजवळ रविवारी सकाळी घडलेल्या भीषण अपघातात त्यांच्या अडीच वर्षांच्या आरोहीचा ट्रॅक्टरच्या ट्रॉलीखाली चिरडून मृत्यू झाला.
किल्लेधारूर (जि. बीड) : ऊसतोडीसाठी स्थलांतरित झालेल्या देवदहिफळ (ता. किल्लेधारूर) येथील एका कामगार कुटुंबातील अडीचवर्षीय चिमुकलीचा ट्रॅक्टरच्या ट्रॉलीखाली चिरडून मृत्यू झाला.