बीड शहरातील १५ रस्त्यांसाठी ७० कोटींचा निधी

क्षीरसागर यांची माहिती : महा अभियान टप्पा क्रमांक दोन अंतर्गत होणार कामे
Beed development fund 70 crore for 15 road construction
Beed development fund 70 crore for 15 road constructionsakal

बीड : शहरात आणखी नवीन १५ रस्ते बांधकामाला ६९ कोटी ८५ लाख रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाल्याची माहिती माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर व माजी नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी दिली. महाराष्ट्र सुवर्णजयंती महा अभियान टप्पा क्रमांक दोन अंतर्गत ही कामे मंजूर झाली आहेत.

बीड शहरात अमृत अटल पाणीपुरवठा योजना व भुयारी गटार योजनेची कामे पूर्ण होत आहेत. मात्र, या कामांमुळे रस्त्यांची वाताहात झाली आहे. शहरातील प्रमुख १६ रस्त्यांची कामे पूर्ण झाली असून नगरोत्थान महा अभियान योजनेअंतर्गत ३१ डिसेंबर २०१८ रोजी पहिल्या टप्प्यात ८६ कोटी रुपयांचा मंजूर झाला होता. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात पंधरा रस्त्यांची कामे करण्यासाठी नगरोत्थान महाअभियान टप्पा क्रमांक दोन अंतर्गत नगर विकास विभागाकडे सात ऑगस्ट २०१८ ला प्रस्तावातील त्रुटी दूर करुन फेरप्रस्ताव सादर केला होता, असे डॉ. भारतभूषण क्षीरसागर म्हणाले. दरम्यान, याबाबत बुधवारी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, माजी नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.

या रस्त्यांची होणार कामे

या अभियान टप्पा क्रमांक दोन अंतर्गत पंधरा डीपी रस्त्यांच्या कामांचा मार्ग मोकळा झाला आहे. यामध्ये अंबिका चौक ते अर्जुन नगर, राजीव गांधी चौक ते व्यंकटेश स्कूल, राधा किसन नगर ते सरस्वती शाळा खोल वाट, बार्शी रोड- दीप हॉस्पिटल-रिपोर्टर भवन, जालना रोड ते थिगळे कॉम्प्लेक्स, कासट यांचे घरापासून- शहर पोलिस स्टेशन- अश्विनी दवाखाना, मसरत नगर- नेत्रधाम- सावरकर चौक, शीतल वस्त्र भांडार मोंढा रोड परिसरातील दोन्ही बाजूचे रस्ते, जालना रोड ते अमरधाम स्मशानभूमी बिंदुसरा पूल, पेठ बीड पोलिस स्टेशन इदगाह ते नालवंडी रस्ता, नाळवंडी नाका ते पाण्याची टाकी, बालाजी मंदिर ते काळा हनुमान ठाणा, बार्शी रोड मुक्ता लॉन्स-तकीया मशीद- फ्रुट मार्केट- खासबाग देवी रोड, अंकुश नगर ही कामे करण्यात येणार आहेत असे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर व माजी नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी सांगितले.

दर्जेदार कामांची बीडकरांना अपेक्षा

यापूर्वी नगर पालिकेमार्फत आणि इतर यंत्रणांनी शहरात रस्त्यांचे जाळे उभारले असले तरी अनेक कामे दर्जाहीन करण्यात आली. परिणामी वर्षे दोन वर्षांत रस्त्यावर पुन्हा खड्डे, धुराळा असा प्रकार घडतो. त्याच रस्त्यांवर दोन वर्षांनी पुन्हा कामे केली जातात. यातून ठेकेदार, पदाधिकाऱ्यांचे खिसे भरत असले तरी बीडकरांना कायम समस्यांना तोंड द्यावे लागते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com