
बीड : जिल्हा नियोजन समितीच्या वार्षिक आराखड्याच्या निधीत सत्ताधारी पक्षाच्या विधानसभा आणि विधान परिषदेच्या आमदारांना भरभरून वाटा मिळाल्याने ही मंडळी खूश आहे. मात्र आघाडीच्या आमदार, खासदारांसह राष्ट्रवादी काँग्रेसची दुसरी फळी आणि महायुतीतील घटक पक्ष शिवसेना अद्याप निधीसाठी वेटिंगवरच आहे.