

dhananjay munde
esakal
Beed NCP: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्यासह ४० स्टार प्रचारांच्या यादीत आमदार धनंजय मुंडेंचे नाव तिसऱ्या स्थानी होते. मात्र, स्वत:ची परळी सोडता त्यांच्या केवळ गंगाखेडला सभा झाल्या. राज्याचे स्टार प्रचारक परळीच्या गल्लीबोळात सभा घेत असल्याचा टोला राजकीय विरोधक दीपक देशमुख यांनी लगावला होता. मात्र, राज्यात इतरत्र त्यांच्या सभांची मागणी झाली नाही की, तेच गेले नाहीत, हे कोडेच आहे.