धारूरमध्ये दारुड्याकडून वृद्धाला अमानूष मारहाण; मृत झाल्याचे समजून विहिरीत टाकण्याचा प्रयत्न

धारूरमध्ये दारुड्याकडून वृद्धाला अमानूष मारहाण; मृत झाल्याचे समजून विहिरीत टाकण्याचा प्रयत्न
Updated on

बीड: बीड जिल्ह्यातील धारुर मधील चिंचपुर रोडवरील शेतातील सर्वे नं.४९ मध्ये एका ६५ वर्षीय वृद्ध शेतकऱ्याला दारूड्या कडून लाकडी दांड्याने , दगडाने आणि लाथाबुक्क्यांनी शिवीगाळ करत अमानूष मारहाण करून मृत झाल्याचे समजून विहिरीत टाकण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.या प्रकरणी धारूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.मात्र अमानूष मारहाण करणारा आरोपी अद्याप मोकाट असल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com