

Beed News
esakal
बीड: राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते गुरुवारी जनगणना अंतर्गत स्वगणनेचा जिल्हास्तरावर अधिकृत प्रारंभ झाला. त्यांनी जनगणनेच्या संकेतस्थळावर स्वतः लॉगीन करून प्राथमिक माहिती भरत या प्रक्रियेचा शुभारंभ केला. ही प्रक्रिया येत्या १५ मे पर्यंत सुरू राहणार असून, यादरम्यान स्वगणना आणि घरगणनेचे महत्त्वाचे काम पूर्ण केले जाणार आहे.