बीड जिल्ह्यात आता तब्बल ३२२ अत्याधुनिक आयसीयू खाटा

राष्ट्रीय आरोग्य अभियानातून उपाययोजना
Beed district 322 ICU beds hospitals
Beed district 322 ICU beds hospitals

बीड : जिल्ह्याच्या शासकीय आरोग्य यंत्रणेत सध्या जिल्हा रुग्णालयात १५ आणि अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात १६ अशा केवळ ३१ आयसीयू खाटा आहेत. विशेष म्हणजे सिव्हिलसह स्वारातीमध्ये सद्यःस्थितीत एकही पेडीअॅट्रीक आयसीयूची खाट नाही मात्र, आता जिल्हा रुग्णालयासह इतर अधिनस्थ संस्थांमध्ये नव्याने तब्बल ३०६ आयसीयू खाटांची उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. लवकरच ही यंत्रणा कार्यान्वित केली जाणार असून यासाठी तज्ज्ञ मनुष्यबळाची देखील गरज आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियानातून हाती घेतलेल्या या आरोग्य संस्था बळकटीकरणाच्या कामास ४० कोटी रुपयांहून अधिक खर्च करण्यात आला आहे. यामध्ये खाटांपासून सर्व आधुनिक उपकरणेही बसविण्यात आली आहे. यात आता १३६ हून अधिक पेडीअॅट्रीक (बालकांचे) बेडचाही समावेश आहे. विशेष म्हणजे सद्यःस्थितीत जिल्ह्यात केवळ स्वाराती व जिल्हा रुग्णालयात (एनआयसीयू-नवजात बालकांचे) आयसीयूच्या ५० खाटा आहेत. कोरोना विषाणू संसर्गाच्या सुरुवातीपासून शासकीय आरोग्य यंत्रणेचे महत्त्व, त्यातील उणिवा आणि अपेक्षीत बळकटीकरणाचे मुद्दे सर्वांसमोर आले. तसे, पूर्वीपासून शासकीय आरोग्य संस्था म्हणजे गरिबांच्या जीवनवाहिन्या मानल्या जातात.

खासगी दवाखान्यांत आयसीयू बेडला रोज साधारण तीन ते पाच हजार रुपयांपर्यंत खर्च मोजावा लागतो. अगदी मध्यमवर्गीयांनाही हा खर्च पेलणारा नसतो. मात्र, शासकीय आरोग्य यंत्रणेत उपकरणांचा अभाव आणि तज्ज्ञांची अपुरी संख्या यामुळे खासगी दवाखान्यांत उपचार घ्यावे लागतात. कोरोना काळात वाढविलेल्या आयसीयू खाटा तात्पुरत्या स्वरूपाच्या होत्या. तर, सध्या जिल्हा रुग्णालयात २० व अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात १६ आयसीयू खाटा आहेत. मात्र, आता यात तब्बल १७० आयसीयू बेडची भर पडणार आहे. यासाठीचा खर्च राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानातून करण्यात आला आहे.

आयसीयू वॉर्डांत या असतील सुविधा

  • फोल्डींग खाट, व्हिलचेअर

  • मल्टीपॅरा मॉनिटर, व्हेंटीलेटर

  • बेड साइड लॉकर, सिरींज पंप, इन्फ्यूजन पंप

  • बाजूला छोटा टेबल, स्टूल, डस्टबीन

  • थर्मामीटर, अॅम्ब्यु बॅग, ईसीजी मशिन, डीफोफ्रिटर

  • मेडीसीन ट्रॉली, ड्रेसिंग ट्रॉली, इन्स्ट्रूमेंट ट्रॉली.

खासगीतही नाही अशा सुविधा व उपकरणे

शासकीय आरोग्य संस्थेत घाण, अपुऱ्या सुविधा, उपकरणांचा अभाव असतो. त्यामुळे खर्च करण्याची कुवत नसली तरी लोक खासगी दवाखान्यांत जातात. मात्र, शासकीय आरोग्य संस्थांमध्ये नव्याने उभारणीचे काम अंतिम टप्प्यात असलेल्या या आयसीयूमध्ये बेड हे आधुनिक आणि पुरेपुर सुविधा असलेली आहेत.

गरिबांना चांगले उपचार मोफत मिळावेत हा शासनाचा हेतू आहे. त्यानुसार जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा बळकट केली जात आहे. यंत्रणेतील दुवे व उपाय योजनांकडे आपले कायम लक्ष आहे. लवकरच ही यंत्रणा कार्यान्वित होईल. त्याचा सामान्यांना अधिकाधिक फायदा होईल.

- राधाबिनोद शर्मा, जिल्हाधिकारी बीड.

अॅडल्ट आयसीयू व पेडीअॅट्रीक आयसीयू उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. यासाठी लवकरच मनुष्यबळ उपलब्ध करून ही यंत्रणा कार्यान्वित केली जाईल. आजही शासकीय आरोग्य संस्थेत सर्व गंभीर उपचार व अवघड शस्त्रक्रिया केल्या जातात. लोकांचा शासकीय दवाखान्यांकडे कल वाढत आहे.

- डॉ. सुरेश साबळे,जिल्हा शल्यचिकित्सक बीड.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com