

Beed News
sakal
शिरूरकासार : तालुक्यातील आर्वी गावात अंत्यसंस्कारासाठी ग्रामस्थांना प्रचंड संघर्षाला सामोरे जावे लागत आहे. या गावाची स्मशानभूमी उथळा नदीच्या पलीकडे आहे. पावसाळ्यात नदीपात्रात पाणी असताना मृतदेह स्मशानभूमीकडे नेण्यासाठी ग्रामस्थांना कसरत करावी लागत आहे. नातेवाईक व उपस्थित ग्रामस्थांना मृतदेह खांद्यावर घेत पाण्यातून रस्ता पार करावा लागतो.