Monsoon Updatesakal
मराठवाडा
Monsoon Update: मागील वर्षाच्या तुलनेत यंदा निम्माच पाऊस; बीड जिल्ह्यात खरीपासाठी अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा
Beed Rainfall: बीड जिल्ह्यात यंदा जुलैअखेर फक्त १९९ मिमी पावसाची नोंद झाली आहे, जी मागील वर्षाच्या तुलनेत निम्मी आहे. या अल्प पावसामुळे खरीप हंगामातील पिकांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
बीड : यंदा मे महिन्यात मॉन्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावल्याने उन्हाळ्यातील टंचाईतून दिलासा मिळाला. तसेच तलावांतील पाणीसाठ्यातही वाढ झाली. मात्र, खरीप हंगामात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. मागीलवर्षीच्या तुलनेत आजपर्यंत निम्माच पाऊस झाला आहे.