Beed News : बीड जिल्हा रुग्णालयाचा भोंगळ कारभार! ​सिझेरियन करताना पोटातच सोडले ग्लोज; आतडे सडले अन् गर्भाशय काढावे लागले; १९ वर्षीय माता मरणाच्या दारात

सामान्य आणि गरीब रुग्णांसाठी आधारवड मानल्या जाणाऱ्या बीडच्या जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांचा अत्यंत निष्काळजी आणि बेजबाबदार कारभार पुन्हा एकदा आला चव्हाट्यावर.
beed district hospital

beed district hospital

sakal

Updated on

बीड - सामान्य आणि गरीब रुग्णांसाठी आधारवड मानल्या जाणाऱ्या बीडच्या जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांचा अत्यंत निष्काळजी आणि बेजबाबदार कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. एका १९ वर्षीय नवविवाहित मातेचे सिझेरियन (प्रसुती शस्त्रक्रिया) करताना डॉक्टरांनी चक्क सर्जिकल हॅन्डग्लोज तिच्या पोटातच सोडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे पोटात पू होऊन आतडे सडल्याने व गर्भाशय खराब झाल्याने पुण्यातील ससून रुग्णालयात शस्त्रक्रिया करून ते काढावे लागले आहे. सध्या ही माता मृत्यूशी झुंज देत असून, या प्रकरणाने संपूर्ण जिल्ह्यात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com