Beed Hospital Case: डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे ‘आईपण’ हिरावले; बीड जिल्हा रुग्णालयातील प्रकार, महिलेची पुण्यात मृत्यूशी झुंज

Beed Hospital Negligence Woman Fights For Life In Pune: बीड जिल्हा रुग्णालयातील सिझेरियनदरम्यान पोटात राहिलेल्या कापसाच्या बोळ्या व सर्जिकल साहित्यामुळे १९ वर्षीय नवविवाहितेचे गर्भाशय काढावे लागले; ससून रुग्णालयात दोन मोठ्या शस्त्रक्रियेनंतर प्रकृती स्थिर
Beed District Hospital Case Woman Battles For Life In Pune After Alleged Doctor Negligence And Pregnancy Loss

Beed District Hospital Case Woman Battles For Life In Pune After Alleged Doctor Negligence And Pregnancy Loss

sakal

Updated on

बीड : बीडच्या जिल्हा रुग्णालयातील सरकारी डॉक्टरांनीच आपल्या पेशाला काळिमा फासला आणि एका नवविवाहितेचे आईपण हिरावून घेतले. या महिलेची सिझेरियन (प्रसूती शस्त्रक्रिया) करताना तिच्या पोटात कापसाचा बोळा आणि सर्जिकल वस्तू राहिल्या. नंतर तिच्या पोटातील आतडे सडल्याने व गर्भाशय खराब झाल्याने पुण्यातील ससून रुग्णालयात महिलेवर शस्त्रक्रिया करावी लागली. यात तिचे गर्भाशय काढावे लागले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com