
विनायक मेटे यांचा गंभीर आरोप; निलंबनाची मंत्री टोपेंकडे मागणी
बीड : जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांच्या मनमानी कारभाराने एका कोरोनाग्रस्ताचा जीव घेतला. व्हेंटिलेटर अभावी रुग्णाचा तडफडून मृत्यू झाला. असे असताना जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. थोरात भ्रष्टाचार आणि वरिष्ठांची हांजीहांजी करण्यात मश्शगुल असल्याचा गंभीर आरोप शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी केला.
प्यार वाली लव्ह स्टोरी : उस्मानाबादचा 'पठ्ठया' प्रियसीसाठी चक्क पाकिस्तान बॉर्डरवर..!
डॉ. थोरात यांना निलंबीत करावे, अशी मागणीही श्री. मेटे यांनी शुक्रवारी (ता. ३१) आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली असून टोपे यांना कारवाईत राष्ट्रवादीच्या आमदारांचा दबाव आहे का, असा सवालही केला आहे. जिल्ह्यात ७३४ कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद झाली असून आणखी शुक्रवारचे अहवाल येणे बाकी आहे. तर, आतापर्यंत जिल्ह्यात आणि बाहेर ३० कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयाचा कारभाराची विनायक मेटे यांनी चांगलीच चिरफाड केली आहे.
कोरोनाबाधित रुग्ण व्हेंटिलेटर बंद पडल्यामुळे मरण पावला, हे धक्कादायक आणि रुग्णालय प्रशासनाचा गलथानपणाचा कळस असल्याचे म्हंटले आहे. जिल्हा शल्यचिकीत्सकांचे जिल्हा रुग्णालयाकडे लक्ष नाही, ते कार्यालयातही बसत नाही, चार महिन्यांत जिल्हा शल्यचिकीत्सकांनी कोविड वार्डमध्ये केवळ एक भेट दिल्याचेही श्री. मेटे यांनी या पत्रात म्हटले आहे.
कोरोना बाधित रुग्णांना काजू अन् अक्रोडचा खुराक
जिल्हा रुग्णालयामध्ये औषधोपचार मिळत नाही, रुग्णवाहिका नसते, वाचमन नसतात, अनेकवेळा विद्युत पुरवठा बंद असतो, जनरेटर खराब असते. या अशा अनागोदीमुळंच जिल्हा रुग्णालयात रुग्ण दगावल्याचे त्यांनी म्हटले आहे. म्हणून अनेक ठिकाणी मरण्यापेक्षा दुसरीकडे मारू असे म्हणून अनेक रुग्ण पुणे - मुंबई - औरंगाबादला जात आहेत. विशेष म्हणजे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे नातेवाईकच येथे उपचार घेत नसून इतर ठिकाणी जातात. यावरूनच येथील उपचाराची गत कळते.
कोरोना बाधित रुग्णांना काजू अन् अक्रोडचा खुराक
आरोग्य सुविधांकरिता कोट्यावधी रुपयांचा निधी आला, परंतु आवश्यक असलेल्या बाबींपेक्षा गरज नसलेल्या बाबींवर उधळपट्टी करण्यात आली. खरेदीही अवाजवी किंमतींनी करण्यात आली. दरम्यान, यापूर्वीही आपली भेट घेतल्यानंतर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले. मात्र, मात्र, तुमच्यावर (राजेश टोपे यांच्यावर) राष्ट्रवादीच्या आमदारांचा दबवा असेल असेही मेटे यांनी पत्रात म्हटले आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे टेंडर आहेत, म्हणून हा प्रकार सुरु आहे. परंतु, राजेश टोपे यांनी अशा लोकांना सांभाळण्यापेक्षा कोरोनाग्रस्त रुग्णांना सांभाळा आणि गलथान व भ्रष्टाचारी लोकांवर त्वरित कारवाई करा, अशी मागणीही विनायक मेटे यांनी केली आहे.
Edited By Pratap Awachar