esakal | प्यार वाली लव्ह स्टोरी : उस्मानाबादचा 'पठ्ठया' प्रियसीसाठी चक्क पाकिस्तान बॉर्डरवर..!
sakal

बोलून बातमी शोधा

border.jpg

 प्रेमात पडल्यावर प्रेमी काय करतील याचा खरच नेम नसतो. त्याचा अजून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उस्मानाबाद शहरातील खाजा नगर भागात राहणाऱ्या युवकाचे पाकीस्तानी मुलीवर प्रेम जडले होते. तो प्रेमात इतका वेडा झाला होता की, त्याने प्रियसीस भेटण्यासाठी थेट पाकीस्तानला जाण्याची तयारीच केली. नव्हे तो भारत-पाकीस्तानच्या सिमेवर भारतीय जवानाना सापडला आहे.

प्यार वाली लव्ह स्टोरी : उस्मानाबादचा 'पठ्ठया' प्रियसीसाठी चक्क पाकिस्तान बॉर्डरवर..!

sakal_logo
By
तानाजी जाधवर

उस्मानाबाद :  प्रेमात पडल्यावर प्रेमी काय करतील याचा खरच नेम नसतो. त्याचा अजून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उस्मानाबाद शहरातील खाजा नगर भागात राहणाऱ्या युवकाचे पाकीस्तानी मुलीवर प्रेम जडले होते. तो प्रेमात इतका वेडा झाला होता की, त्याने प्रियसीस भेटण्यासाठी थेट पाकीस्तानला जाण्याची तयारीच केली. नव्हे तो भारत-पाकीस्तानच्या सिमेवर भारतीय जवानाना सापडला आहे. उस्मानाबादच्या पोलीसांनी तातडीने त्याला घेऊन येण्यासाठी एक पथक रवाना केल्याचे पोलीस अधिक्षक राजतिलक रौशन यानी सांगितले आहे. 

पालकमंत्र्यांपासून अल्पभूधारक शेतकरी ठेवले चार हात दूर, कृषी विभागावर शेतकरी संतापले  

उस्मानाबाद शहरातील खाजा नगरमध्ये राहणारा विशाल सलीम सिध्दीकी हा तरुण अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे. सोशल मिडीयाच्या माध्यमातुन त्याचे सबंध एका पाकीस्तानी मुलीशी आले.त्यातुन संवाद सुरु झाला,संवादाचे रुपांतर प्रेमात झाले.तो प्रेमात एवढा पुढे गेला की, त्याला दोन्ही देशाच्या सिमेचा व सबंधाचाही विसर पडल्याचे दिसुन येत आहे.तो ११ जुलै रोजी घरातुन गायब झाला होता,त्याची रितसर तक्रारही त्यांच्या कुटुंबियानी उस्मानाबाद शहर पोलीस ठाण्यात दिलेली आहे. सध्या लॉकडाऊन तसेच जिल्हाबंदी असल्याने हा तरुण चक्क मोटारसायकल घेऊनच गेल्याचे पुढे आले आहे. 

धक्कादायक..! औरंगाबाद प्राणिसंग्रहालयात तब्बल पाच वाघांचा मृत्यू, वाचा सविस्तर..!

नगरमधून तो गुजरातच्या दिशेने सीमेपर्यंत पोहचल्याचे तपासात उघड झाले आहे. त्याच्या सोशल मिडीयाच्या अकाऊंटवरुन जिल्हा पोलीस दलाने त्याची सगळी माहिती गोळा केली होती, पोलीसांना या प्रेमप्रकरणाबद्दल माहिती मिळाल्यानंतर त्याचा सध्याचा पत्ता शोधल्यानंतर गुजरातच्या कच्छ भागामध्ये असल्याचे त्याना कळाले. तेव्हा पोलीस अधिक्षक राजतिलक रौशन यानी गुजरातच्या पोलीसाची मदत घेऊन घडलेला प्रकार सांगितला, त्यानंतर तेथील पोलीसांनी त्याची यंत्रणा कामाला लावली.

सावंगीत कब्रस्तानाच्या कडेला आढळली शिवपिंड; गावकऱ्यांनी हा घेतला निर्णय..!  

शिवाय त्यानी सीमा सुरक्षा दलास देखील याची कल्पना दिली, तरुणाचा शोध घेण्याचे प्रयत्न सूरु झाले होते. अशाप्रकारे संशियतरित्या फिरणाऱ्या तरुणाचा माग काढत सीमा सुरक्षा दलाने अखेर त्याचा शोध लावला. तो भारतीय सिमेवरच असल्याचे त्याना लक्षात आल्यानंतर त्यानी काही अंतरावरुन त्यास ताब्यात घेतल्याचे दिसुन येत आहे. उस्मानाबादच्या पोलीस दलाकडून एक पथक गुजरातला गूरुवारी (ता.१६) रवाना केली आहे. त्यामुळे ते लवकरच तेथील प्रक्रिया पार पाडुन शहरात येतील असे पोलीसांनी सांगितले आहे. सध्यातरी या तरुणाने प्रेमप्रकरणातुनच असा प्रकार केल्याचे दिसुन येत आहे, त्याच्या पाठीमागे काही वेगळा हेतू होता का याची तपासणी तो आल्यानंतर केली जाणारच आहे. प्राथमिक माहितीमध्ये त्याने प्रेमप्रकरणातुनच हे पाऊल उचलल्याचे दिसुन येत आहे.
राजतिलक रौशन, पोलीस अधिक्षक, 


 

loading image
go to top