Heavy Rain Beed: आभाळ फाटलं निसर्ग कोपला; बंधारा फुटला, तर कुठे संपर्क तुटला, नित्रुड येथे सात लोक पुरात अडकले
Beed Rain: बीड जिल्ह्यात सलग पंधरवडा अतिवृष्टीमुळे अनेक नद्या ओसंडून वाहल्या, गावांचे संपर्क तुटले आणि पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. एनडीआरएफच्या मदतीने बचावकार्य युद्धपातळीवर सुरु असून शेतकऱ्यांनी तातडीने पंचनामे करून भरपाईची मागणी केली आहे.
बीड : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पावसाने हाहाकार माजवला असून, वरुणराजाचा कोप पुन्हा एकदा झाला. ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीनंतर या पंधरवाड्यात जिल्ह्यात तब्बल आठ वेळा अतिवृष्टी झाली आहे.