Beed Drought ; शेतात पिकांचे सांगाडे, मग कसले पंचनामे? ;पाहणीचा फार्स थांबवा अन् थेट मदत द्या; जिल्ह्यातील बळिराजांनी फोडला टाहो, उपायांची मागणी

Beed Drought, Crop Damage, Farmers Seek Relief बीड जिल्ह्यात दुष्काळामुळे पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. दुष्काळ जाहीर झाल्यानंतर पंचनामे, अहवाल आणि मदतीच्या प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.
Beed Drought

Beed Drought

esakal

Updated on: 

नितीन चव्हाण

बीड,: शेतातलं पीक वाळून पार कोळसा झालंय... डोळ्यातलं पाणी आटलंय, पण सायेब, आमच्या पदरात अजूनही फक्त कोरडी आश्वासनंच आहेत. सांगा, लेकरा-बाळांना काय खाऊ घालू आणि दावणीच्या जनावरांना काय देऊ? हा आर्त टाहो आहे बीड जिल्ह्यातील एका हतबल शेतकऱ्याचा. हे केवळ प्रातिनिधिक शब्द नाहीत, तर आज संपूर्ण बीड जिल्ह्यातील ११ तालुक्यांमधील लाखो दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या काळजातील हा धगधगता आक्रोश आहे. सरकारने संपूर्ण जिल्ह्यात दुष्काळ जाहीर केला; पण आधी पंचनामे, मग अहवाल आणि नंतर मदत, या सरकारी लालफितीच्या अटींमुळे बळिराजाच्या मनात तीव्र संताप आणि हताशतेची लाट उसळली आहे. डोळ्यांदेखत पिकांची राखरांगोळी झालेली असताना आणि शेतात वाळलेली पिके सांगाड्यांसारखी उभी असताना आता मदतीसाठी कसले पंचनामे करताय? असा थेट आणि रोखठोक सवाल शेतकरी विचारत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com