Beed Extortion Case : सरपंच हत्या प्रकरणात नवा खुलासा! प्रकल्प व्यवस्थापकाचेही झाले होते अपहरण
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख यांच्या हत्येपूर्वीच मस्साजोग पवनचक्की प्रकल्पाच्या व्यवस्थापकाचे दोनदा अपहरण झाल्याचे उघडकीस आले आहे. वाल्मीक कराडने दोन कोटींची खंडणी मागितल्याने हा गुन्हा घडल्याचे तपासातून निष्पन्न झाले.
बीड : वाल्मीक कराड याने अवादा कंपनीच्या मस्साजोग (ता. केज) येथील पवनचक्की प्रकल्पाकडे दोन कोटींची खंडणी मागीतली आणि खंडणीला अडसर ठरल्याने मस्साजोगचे (ता. केज) सरपंच संतोश देशमुख यांचे नऊ डिसेंबरला अपहरण करून खून झाल्याचे तपासातून निष्पन्न झाले.