

Beed News
esakal
बीड: शेती करायची म्हटलं तर केवळ पाणी असून चालत नाही, तर त्या सोबतीला कष्ट आणि तितकाच संयमही महत्त्वाचा असतो. निसर्गाचा लहरीपणा किंवा एखादा प्रयोग अयशस्वी झाला म्हणून हबकून जाण्याऐवजी, नव्या जिद्दीने पुन्हा मातीत घाम गाळण्याची तयारी कशी असावी, याचे जिवंत आणि अत्यंत प्रेरणादायी उदाहरण म्हणजे बीड परिसरातील वांगी येथील प्रयोगशील शेतकरी दिलीप बजगुडे !