Beed Farmer: दहा महिन्यांत १९८ शेतकऱ्यांचे टोकाचे पाऊल, कर्जबाजारीपण आणि पिकहानीमुळे!
Farmer Crisis: कोरड्या-ओल्या दुष्काळाने शेतकऱ्यांवर घालवला विळखा; कर्जबाजारीपण आणि बाजारभावाचा दडपण, १९८ प्राणांचा घात. बीड जिल्ह्यात जानेवारी २०२५ पासून ऑक्टोबर अखेरपर्यंत दर दीड दिवसाला म्हणजे ३६ तासाला एक शेतकरी मृत्यूची नोंद होत आहे.
बीड : कोरड्या-ओल्या दुष्काळामुळे पिकांची हानी, बाजारात मिळणारा कमी भाव, नापिकी तसेच कर्जबाजारीपणामुळे बीड जिल्ह्यात यावर्षी जानेवारीपासून आतापर्यंत तब्बल १९८ शेतकरी आत्महत्या झालेल्या आहेत.