
Beed Flood Alert
sakal
बीड : जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा अधिक पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. गोदावरी, सिंदफणा, मांजरा व कुंडलिका या प्रमुख नद्यांचे पाणी दुथडी भरून वाहत आहे. तसेच, माजलगाव व धनेगाव धरणांतूनही पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये साचलेल्या पाण्यामुळे साथरोगाचा धोका निर्माण झाला आहे. मात्र, काही योग्य उपाययोजनांनी हा धोका टाळणे शक्य आहे.