बीड : माजी मंत्री नवलेंचा शिंदे गटात प्रवेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Beed Former minister suresh Navale joins Eknath Shinde group

बीड : माजी मंत्री नवलेंचा शिंदे गटात प्रवेश

बीड : माजी मंत्री प्रा. सुरेश नवले यांनी सिल्लोड (जि. औरंगाबाद) येथील कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी शिवसेना नेते रामदास कदम, आमदार अब्दुल सत्तार, माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर उपस्थित होते.

बीडमधून दोनदा आमदार असलेले प्रा. नवले पहिल्या युतीत राज्यमंत्री होते. त्यानंतर त्यांनी बंडखोरी केली होती. नंतर काँग्रेसकडून ते विधान परिषदेवर सदस्य झाले. काही दिवसांपूर्वी त्यांनी शहरात प्रा. सुरेश नवले मित्रमंडळाची स्थापना केली होती. दरम्यान, यावेळी शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख अ‍ॅड. चंद्रकांत नवले यांच्यासह समर्थकांनीही शिंदे गटात प्रवेश केला.

Web Title: Beed Former Minister Suresh Navale Joins Eknath Shinde Group

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..