Beed News: बीड जिल्ह्यात पुन्हा इंधनटंचाई; पंप कोरडेठाक, वाहतुकीवर परिणाम; पेट्रोल-डिझेलच्या तुटवड्यामुळे शहरात वाहनांच्या रांगा

Beed District Faces Fuel Shortage: शेती, परीक्षेसाठी वाहने आणि रोजच्या वाहतुकीवर याचा मोठा परिणाम होत असून प्रशासन तत्परतेने उपाय करत आहे.
Beed News

Beed News

esakal

Updated on

बीड: पाच दिवसांपासून जिल्ह्यात इंधनटंचाई जाणवत आहे. परळी, अंबाजोगाई, वडवणीमार्गे या इंधनटंचाईच्या झळा आता बीड शहरात पोचल्या आहेत. तसेच जिल्‍ह्याच्या पश्‍चिमेला कडा, पाटोदा, आष्टी तालुक्यांमध्येही पंप कोरडेठाक आहेत. ७० टक्के पंपांवर इंधन नाही, तर उर्वरित २० टक्के पंपांवर वाहनांच्या रांगा आहेत. आज रविवारी (ता. तीन) राष्ट्रीय पात्रता परीक्षा असल्याने आपल्या मुलांना शहरात परीक्षेला नेण्यासाठी वाहनांमध्ये इंधन भरताना पालकांची कसरत होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com