
बीड: विविध आठ गुन्हे नोंद असलेला सतीश ऊर्फ खोक्या निराळ्या भोसले हा मागील चार महिन्यांपासून चांगलाच चर्चेत आहे. त्याला जामीन मिळताच पोलिस दलाने त्याच्यावरील कारवाईचा फास अधिक घट्ट आवळला आहे. एमपीडीएअंतर्गत कारवाई करून त्याची रवानगी पुन्हा छत्रपती संभाजीनगरच्या हर्सूल कारागृहात करण्यात आली. जिल्ह्यातील गुंडगिरी व गुन्हेगारीवर पायबंद घालण्यासाठी पोलिसांकडून अशा कारवाया करण्यात येत आहेत.