
Georai car crash news : बीड जिल्ह्यातील गेवराईमध्ये भीषण अपघात झाला असून या 6 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. धुळे सोलापूर महामार्गावर हा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार गेवराईजवळील गढी पुलाजवळ भरधाव कार दुभाजकाला धडकली होती, त्यानंतर अडकलेली कार बाहेर काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या 6 जणांना भरधाव ट्रकने उडविले. यात 6 जणांचाही जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.