esakal | मित्राचा खून करून स्वत:चा भासवला
sakal

बोलून बातमी शोधा

File photo

दरोड्याच्या शिक्षेतून वाचण्यासाठी त्याने ही शक्कल लढवली. पोलिसांनी जलदगतीने तपास करीत दहा दिवसांत छडा लावून आरोपीला हैदराबाद येथून अटक केली.

मित्राचा खून करून स्वत:चा भासवला

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बीड : दरोड्याच्या गुन्ह्यात शिक्षा होणार हे लक्षात आल्यानंतर यातून वाचण्यासाठी स्वत:चा खून झाल्याचे भासविण्याचा प्रयत्न करून मित्राचा खून करणाऱ्या रसूल सत्तार कुरेशी यास पोलिसांनी हैदराबाद येथून अटक केली. खून झालेली व्यक्ती त्याचाच मित्र अलीम इस्माईल शेख असल्याचे निष्पन्न झाले आहे. गुरुवारी (ता. २६) पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी पत्रकारांना ही माहिती दिली.


पोलिसांनी सुतावरून स्वर्ग गाठण्याचे कसब या तपासात पार पाडले आहे. अंबाजोगाईत बुटेनाथ परिसरात १७ मार्चला एक मृतदेह आढळला. मृतदेहाचा चेहरा संपूर्ण कातडी काढून छिन्नविच्छिन्न केलेला होता. मात्र, खिशात रसूल सत्तार कुरेशी याचे आधार कार्ड होते. त्यामुळे हा मृतदेह त्याचाच असावा असे वाटणे साहजिक होते. त्याच्या पत्नीनेही हा मृतदेह आपल्या पतीचाच असल्याचे सांगितले.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

परंतु तपासात पुढे आलेले सत्य एखाद्या चित्रपटाच्या कथानकाप्रमाणे आहे. रसूल सत्तार कुरेशीने मित्र अलीम इस्माईल शेख याचा खून करून तो आपला असल्याचे भासविले. दरोड्याच्या गुन्ह्यात शिक्षा होणार असल्याने त्याने हा सर्व प्रकार केला.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक भारत राऊत, फौजदार श्री. एकिलवाले, सहायक पोलिस निरीक्षक श्री. दहिफळे, भास्कर केंद्रे, बालाजी दराडे, तुळशीराम जगताप, शेख नसीर, विकास वाघमारे, मुकुंद तांदळे, शेख आसेफ, संगीता सिरसाठ, संजय जायभाये, अतुल हराळे, मुकुंद सुस्कर, श्री. आवले, श्री. येलमटे यांनी हा गुन्हा उघड करून आरोपीस अटक केल्याची माहिती हर्ष पोद्दार यांनी दिली. यावेळी अपर पोलिस अधीक्षक विजय कबाडे उपस्थित होते.

loading image