
बीड: पोटातील गर्भ तीस तासांपूर्वी मृत झालेला असताना जिल्हा रुग्णालयात दाखल झालेल्या महिलेवर शस्त्रक्रिया करण्याऐवजी उद्या सकाळी करू, सायंकाळी करू, असे म्हणत चालढकल करण्यात आली. शेवटी ‘खासगी रुग्णालयात घेऊन जा’ असा सल्ला देत महिलेल्या जिवाशी खेळण्याचा प्रकार घडला. दरम्यान, जिल्हा शल्यचिकित्सकांकडे याबाबत विचारणा झाली. त्यानंतर शनिवारी खासगी रुग्णालयातून पुन्हा जिल्हा रुग्णालयात आणून महिलेची शस्त्रक्रिया करण्यात आली.